शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी खासदार संजय राऊत यांची वरणी लागली आहे. या बाबत स्वता: शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहीले.

दोन्ही सभागृहात समन्वय साधण्यासाठी तसेच सरकार विरोधातील अविश्वासच्या वेळी झालेला व्हीप घोळाची पुर्नावृत्ती होऊ नये यासाठी हा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी निवडणुकीत भाजपा व इतर पक्षाकडून शिवसेनेच्या नेत्यांना गळाला लावण्याचा चांगलाच प्रयत्न होणार आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संजय राऊताची ढाल पुढे करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहात खासदारांवर नेते म्हणून संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.

नियुक्तीमागे आहे तरी काय राजकारण 

पहिल्यांदाच दोन्ही सभागृहाचा नेतेपदी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना खासदारांचे अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर येत आहे. दोन्ही सभागृहात गटनेते असूनही दिल्लीतल्या महत्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कायम अनिल देसाईंवर असायची. मात्र जीएसटी आणि इंधन दरवाढ सारख्या ज्वलंत विषयांवर अर्थमंत्री अरुण जेटली आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनिल देसाई यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर खासदारांच्या प्रत्येक परदेशवारीला अनिल देसाईच जात असत.

लोकसभेत आनंदराव अडसूळ आणि राज्यसभेत संजय राऊत जरी गटनेते असले तरी व्हीपच्या घोळानंतर खासदारांमध्ये समन्वयाचा अभाव शिवसेनेत प्रकर्षाने जाणवत होता. खरंतर या राजकारणाचा फायदा उचलत उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांना डचू देत संजय राऊत यांनी बाजी मारल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘ते’ प्रमाणपत्र सादर करण्यास नगरसेवकांना ६ महिन्यांची मुदतवाढ

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32f567c7-bb33-11e8-9f0e-63a7c49c37b2′]