बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांच्या जातींचे ओंगळवाणे प्रदर्शन

पटना : वृत्तसंस्था

समतेची हाक देणाऱ्या बिहारमध्ये आता खुलेपणाने जातीचा उल्लेख बॅनरवरुन सुरु झाला आहे. बिहारमध्ये काँग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर सध्या टीकेचे निमित्त ठरले आहे. या बॅनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो छापून, त्यावर त्यांच्या जाती लिहिण्यात आल्या आहेत. ‘सामाजिक समरसता’ या गोड गोंडस मथळ्याखाली हे बॅनर छापण्यात आले आहेत. पटन्यातील इन्कम टॅकस चौकात हे बॅनर लावण्यात आलेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’904d7a6b-c20d-11e8-bfe1-79b7f3c7f3b4′]

बिहार राज्यातील कार्यकारिणीत काँग्रेसने मोठे बदल केले. अनेक नव्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. यात विविध समाजातील व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय.आपण किती सर्वधर्म-जात समभाव मानतो, हे दाखवण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी चक्क या नव्या कार्यकारिणीतील नेत्यांच्या जाती शोधून, त्यांचे ओंगळवाणं प्रदर्शन मांडले त्यावर त्यांचे फोटो छापलेच, सोबत जातही लिहिल्यात.

[amazon_link asins=’B017RT7MMU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98aedc65-c20d-11e8-98e4-bf174295a062′]

नव नियुक्त बिहार काँग्रेस कार्य समिती में सामाजिक समरसता की मिसाल कायम असा मथळा छापत हे बॅनर लावण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या बॅनरवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो छापून त्यावरही ब्राम्हण समुदाय असे लिहिले आहे.

कर्जवसुलीसाठी भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा लिलाव होणार

एकीकडे समानतेची हाक द्यायची आणि दुसरीकडे विषमतेची बिजं पेरणाऱ्या जातींचे ओंगळवाणं प्रदर्शन करायचे, अशा दुटप्पी भूमिकेत बिहार काँग्रेस वावरत असल्याचेच या बॅनरवरुन दिसून येतेय. शिवाय, बिहारमधील राजकारण जातींच्या भोवती किती गिरक्या घालते, हेही यातून समोर येते.