जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून २० ठार

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था

जम्मू काश्मीर येथील रामबन जिल्ह्यातील बनिहाल या ठिकाणी प्रवासी बस कोसळून अपघात झाला आहे. या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ आज सकाळी ही घटना घडली. बसमध्ये सुमारे ३३ प्रवासी होते. १३ प्रवासी गंभीर जखमी आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8cbc3bf4-c96b-11e8-bd99-5f064a9474e2′]

ही बस बनिहालहून रामबनला निघाली होती. हायवेजवळच्या केलामोठ भागात ही बस आली असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. या अपघातात १५ जण जागीच ठार झाले अन्य १७ जण गंभीर होते.ही बस ज्या ठिकाणी कोसळली तो भाग खोल आहे. त्यामुळे बचाव कार्यात काहीशा अडचणी येत आहेत. सुरुवातीला दहाजण ठार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र मृतांचा आकडा आता २० वर पोहचला आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7770974-c96b-11e8-ab99-f981b7e88680′]
स्थानिकांच्या मदतीने लष्कराने तत्काळ बचावकार्य सुरू केले. जखमींना एअरलिफ्ट करून उधमपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. आतापर्यंत एकूण २० जण या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे तर पोलीसही त्या ठिकाणी पोहचले आहेत. जम्मू कश्मीरच्या राज्यपालांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचीही घोषणा केली आहे.

[amazon_link asins=’B0793PRJRP,B078H8MJ78′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16c2b4ea-c96c-11e8-ad74-cd275e166107′]