…तर रोज एक पंतप्रधान आणि रविवारी देश सुट्टीवर असेल : अमित शहा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. विरोधक भाजपची सत्ता घालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू अद्याप विरोधकांच्या महाआघाडीचे चित्र स्पष्ट नाही. कोणते पक्ष कोणती आणि किती जागा लढवणार यावर अद्याप चर्चा सुरुच आहेत. त्यात नवीन पंतप्रधान कोण असेल हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी माहाआघाडीवर टीका केली आहे. कानपूर येथील सभेत अमित शहा बोलत होते. देशात महाआघाडी सत्तेत आली तर पंतप्रधानांची लिस्ट त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तसंच रविवारचा देश सुट्टीवर असेल अशी टीका त्यांनी यावेळी केली.

देशात महाआघाडी सत्तेत आली तर सोमवारी बसपाच्या मायावती, मंगळवारी सपाचे अखिलेश यादव, बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा आणि शनिवारी स्टॅलिन असे पंतप्रधान असतील. रविवारी देश सुट्टीवर असेल, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

आम्ही नवीन भारत बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. तर काही लोक आमच्या प्रयत्नांची मस्करी करत आहेत. तसंच यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे कौतुक केले. उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडलेली होती. आज तिथं कडक प्रशासन आहे. आज तेथील सर्व गुंडांनी तेथून पलायन केले आहे.

दरम्यान, यावेळी योगींनंतर अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहे जे कोणासमोर न झुकता देश चालवू शकतात, असं कौतुक अमित शहा यांनी केलं.