गणेशोत्सव काळातील दारूबंदीला स्थगिती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

गणेश उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून अमरावती जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्याच्या जिल्हाधकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गणेश स्थापना ते गणपती विसर्जन या कालावधीत देशी व विदेशी मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका नितीन मोहोड आणि सुनील खुराणा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c6c49592-b649-11e8-8cc3-9920beab97cf’]
या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत दारूबंदी कोणत्या आधारावर घोषित करण्यात आली, असा सवाल करीत शुक्रवारपर्यंत उत्तर सादर करावे, असे आदेश अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी कायद्यातील कलम १४२ (१) मधील तरतूदीनुसार १३ ते ३० सप्टेंबर काय कालावधीत मद्य विक्री बंद करण्यात यावी, असा आदेश पाच सप्टेंबर रोजी काढला. त्यात अमरावती जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सदर आदेश काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ccdeee57-b649-11e8-b539-7768d6ecf6a3′]

९ सप्टेंबरला पोळा, १३ सप्टेंबरला गणेश स्थापना आणि २४ ते ३० सप्टेंबर गणपती विसर्जन असल्याने त्या कालावधीत दारूबंदी लागू करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. सदर आदेशाला मंगळवारी आव्हान देण्यात आले. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी अधिसूचनेनुसार अमरावतीत दारू विक्री बंद होती. परंतु, आता त्या आदेशाला १४ तारखेपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांना १४ तारखेला स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखविण्याची सक्ती