‘हे’ कलाकार बनणार आता स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर 

नवी दिल्ली

यश राज फिल्म्स बॅनर अंतर्गत तयार झालेला ‘सुई धागा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित असून यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.  ‘मेक इन इंडिया थीमवर आधारित असलेल्या चित्रपटात काम करून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या वरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

या चित्रपटातून भारतातील तळागाळातील अत्यंत बुद्धिमान कारागीर आणि कौशल्यपूर्ण कामगारांच्या क्षमतांवर आणि त्यांच्यासमोरील आव्हाने तसेच समस्यांवर भर देण्यात आला आहे. वरूण आणि अनुष्का हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार असून त्यांनी स्किल इंडियासोबत भागीदारी केली आहे. भारताच्या कौशल्यपूर्ण बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तसेच या कलाकारांच्या कामाचा प्रसार करण्यासाठी भारतातील विविध भागांमध्ये त्यांच्यासोबत वरून आणि अनुष्का सहभागी होतील. स्किल इंडिया मोहीम सरकारच्या देशातील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाला सहभागी करून सहकार्य करण्याच्या हेतूने प्रेरित आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1e3c900-bcc1-11e8-ad40-97a83c512b85′]
सुईधागा- मेड इन इंडिया या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय उद्योजक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, कलाकार आणि विणकरांना सलाम करत आहेत. वरुण यामध्ये मौजी नावाच्या टेलरची भूमिका करत असून अनुष्का त्याची पत्नी आणि एम्ब्रॉयडर ममताच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
[amazon_link asins=’B019XSHB7O,B077GRCS3Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aefb3a54-bcc1-11e8-b286-471b8f214940′]