जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बापमाणूस करणनं आणलं बाळांना घरी

बापमाणूस करणनं आणलं बाळांना घरी

बापमाणूस करणनं आणलं बाळांना घरी

करण जोहरनं आपल्या दोन्ही बाळांना-रूही आणि यशला- आपल्या घरी आणलंय. गेल्या महिन्यात करण बाबा बनला. पण प्री-मॅच्युअर डिलिवरीमुळे बाळांना हाॅस्पिटलमध्येच ठेवावं लागलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    30 मार्च : करण जोहरनं आपल्या दोन्ही बाळांना-रूही आणि यशला- आपल्या घरी आणलंय. गेल्या महिन्यात करण बाबा बनला. पण प्री-मॅच्युअर डिलिवरीमुळे बाळांना हाॅस्पिटलमध्येच ठेवावं लागलं होतं. करणनं मुलांना उचलून घेतलेला फोटो वायरल झालाय. पण त्यात तो पाठमोरा दिसतोय. करणची ही मुलं 10 आठवडे अगोदर जन्मली. पण आता दोघंही व्यवस्थित आहे. करण म्हणतो,‘मुलांची वजनं कमी होती,म्हणून खूप टेंशन होतं. तेव्हाच वाटायचं, मुलांना जवळ घ्यावं. पण परवानगी नव्हती हात लावायची. पण आता सगळं ठीक आहे.’

    जाहिरात

    करण जोहर दोघांचीही खूप काळजी घेतोय. ‘बापमाणूस’ झाल्यावर करण जोहरवर नवी जबाबदारी आलीय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात