शिवसेनेच्या ‘या’ कार्यकर्त्याने मागितली खंडणी

अहमदनगर: पोलीसनामा आँनलाईन – दिल्लीगेट येथील दुकानदारास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या गिरीश जाधव याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीगेट येथील साताळकर हॉस्पिटलसमोर मिठाई दुकानदार व रसवंतीचालकास पैसे मागितल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी गिरीश तुकाराम जाधव, राजेश तुकाराम जाधव, तुकाराम जाधव, बाळू जाधव (सर्व रा. रेणावीकर कॉलनी, साताळकर हॉस्पिटल शेजारी, बागरोजा हडको, दिल्‍लीगेट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याने नुकतीच महापालिका निवडणुकीत भाजपाची उमेदवारी केली होती.

मदनलाल रामअवतार पुरोहित (वय 60) यांचे मधुरा नावाचे मिठाईचे दुकान आहे. त्यांच्यालगत भगवान हिवाळे यांचे रसवंतीचे दुकान आहे. गिरीश जाधव व त्याच्या कुटूंबातील इतरांनी त्याला पैसे मागितले. ‘आमच्या परिसरात धंदा करायचा असेल तर दरमहा चार हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी दमदाटी केली. पुरोहित यांनी नकार दिल्संयानंतर गिरीश जाधव व इतरांनी पुरोहित यांना मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मदनलाल पुरोहीत यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश
तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देईल
सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘ही’ आठ कागदपत्रे महत्वाची