राज ठाकरे उगवता तारा, राशीचक्रकार शरद उपाध्यें

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचा मुंबई येथील मुलुंड येथे ”शरदांचे चांदणे” कार्यक्रमाकरिता जात होते याच दरम्यान दादरमधील रानडे रोड येथील फेरीवाल्यांच्या समस्येचा त्यांना सामना करावा लागला. फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाला त्यांनी रविवारी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वाचा फोडली. या पोस्टमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे समर्थन केले.
राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून समर्थन केले आहे. राज ठाकरेंना मराठी माणसाची होणारी कोंडी सहन होत नाही.अन्याय सहन न होणारा माणूस थोडा रागीट,स्पष्टवक्ता,कडक वाटतो पण आरामाचे आयुष्य सोडून मराठी माणसासाठी स्वतःवर शेकडो केसेस ओढवून घेणा-या माणसाची तळमळही समजून घेतली पाहिजे. मित्रमैत्रिणींनो एकदा संधी देऊन पाहूया का?, असे आवाहन त्यांनी पोस्टमध्ये केले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfe4817c-c573-11e8-97d0-510ec7125ece’]
फेसबुक पोस्टमध्ये शरद उपाध्ये म्हणतात, काल रात्री मुलुंडला “शरदांचे चांदणे” कार्यक्रमासाठी दादरच्या रानडे रोडवरून जाताना राज्यकर्त्यांच्या बेफिकिर वृत्तीचे किळसवाणे दर्शन झाले. माणसांना चालण्यासाठी ठेवलेल्या पदपथावर फेरीवाले ऐसपैस कपड्याचे स्टॉल्स लावून बसले होते. ती जागा पुरेना म्हणून मग रस्यावर अतिक्रमण केले होते. चालायची सोय नव्हती आणि एका गरोदर बाईच्या पोटावर एका माणसाचे कोपर लागून ती बाई असह्य कळवळली. कोणीही मदतीला आले नाही. एका सरबतवाल्याने तर रस्त्याच्या जवळ जवळ मध्यभागीच स्टॉल लावला होता व एका घाणेरड्या बादलींतील पाणी पातेल्यात ओतून सरबत वाढवत होता.आणि सुशिक्षित लोक ५० -५- रुपये देऊन घटाघट प्याले रिचवीत होते. त्यामुळे आख्ख्या रानडे रोडवर ट्रॅफिक जाम झाला होता.त्यातच एक रुग्णवाहिका सापडली होती.सतत सायरन वाजत होता. कोण ऐकणार! सबंध रानडे रोड गलिच्छ झाला होता, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
या फेरीवाल्यांना परवानगी देणा-यांना एकदा सहकुटुंब संध्याकाळी त्या रस्त्यावरून चालवले पाहीजे. भरपूर पैसे खाताना आता बरे वाटेल पण विषयाचे सुख इथे वाटे गोड! परंतू पुढे यमयातना अवघड! हे लक्षात ठेवावे, अशा शब्दात त्यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली.
[amazon_link asins=’B00ZR9C9Q2,B01HQ4O058′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e728ecd0-c573-11e8-b644-e7832aa192de’]
सर्वत्र बजबजपुरी माजलेली असताना कोणीतरी खंबीर राज्यकर्ता लाभला पाहिजे. नियम कडक केले पाहिजेत. न्यायदान लवकर झाले पाहिजे.जनता विचारी झाली पाहिजे की बेकायदा कामांना सहकार्य करायचे नाही. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून काहीही विकत घ्यायचे नाही असे ठरविले तर ते गाशा गुंडाळतीलच. जनताजनार्दन हाच खरा शासनकर्ता आहे. अधिका-यांना कामाला कसे लावायचे हे मग सोपे होईल, असे त्यांनी नमूद केले.
पोस्टमध्ये शरद उपाध्येंनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला. ते म्हणतात, राज ठाकरेंसारखा अन्याय सहन न होणारा तडफदार माणूस स्वतः मैदानात उतरतो. टोलबंदीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आझाद मैदानावर आमच्या पोलीस महिलांच्या ब्लाउजमध्ये हात घालून त्यांना लज्जास्पद वाटेल असे वर्तन करणा-या निर्लज्ज मवाल्यांच्या विरुध्द चवताळून त्यांनी मोर्चा काढला. मराठी माणसांना तुच्छ वागणूक देणा-या धनदांडग्यांना त्यांनी ताळयावर आणले. रेल्वे पुलावरील फेरीवाल्यांना हुसकावून लावून पूल चालण्यासाठी मोकळे करून देण्यात राज ठाकरेंचा पुढाकार होता. त्यांना मराठी माणसाची होणारी कोंडी सहन होत नाही.अन्याय सहन न होणारा माणूस थोडा रागीट,स्पष्टवक्ता,कडक वाटतो. पण आरामाचे आयुष्य सोडून मराठी माणसासाठी स्वतःवर शेकडो केसेस ओढवून घेणा-या माणसाची तळमळही समजून घेतली पाहिजे.पण तेही शेवटी हताश होऊन सांगतात,”अरे माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा.सत्ता हातात आल्याशिवाय मी तुमची कामे कशी करणार!” मित्रमैत्रिणींनो एकदा संधी देऊन पाहूया का?, असे त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
[amazon_link asins=’B01JP4NK12,B01194PF96,B078W4TXQF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f706f7b0-c573-11e8-a08e-7d75b2684b74′]
शरद उपाध्येंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टला सहाशेहून अधिक लोकांनी शेअर केले असून पोस्टला एक हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
जाहिरात