माझ्या नावे बिग बींवर आरोप करणारे ‘ते’ मेसेज खोटे : सयाली भगत

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

#MeToo हे वादळ दिवसेंदिवस वाढत आहे. तनुश्री दत्ता – नाना पाटेकर प्रकरणापासून सुरू झालेली ही चळवळ आता जोर धरत आहे.  #MeToo या चळवळीमध्ये आता हिंदी कलाविश्वात बऱ्याच अभिनेत्री खुलेपणाने बोलू लागल्या आहेत. मुख्य म्हणजे या अभिनेत्रींनी ज्या व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, त्यांची नावं पाहून अनेकांनाच धक्का बसत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1229af8-cd1f-11e8-956a-f5c91ea85ccd’]

यादरम्यान, माजी मिस इंडिया सयाली भगत हिने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर काही वर्षांपूर्वी केलेल्या कथितआरोपांची चर्चा पुन्हा रंगली आहे. मात्र, मी अमिताभ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत, सर्व मेसेज खोटे असून आमची बदनामी थांबवा, अशी विनंती सयाली भगत हिने केली आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aa509d48-cd1f-11e8-ace4-4db6e76e20e5′]
काय होता तो मेसेज?
”टिनू वर्मांच्या ‘द वीकेंड’ या सिनेमाच्या लाँचिंगला अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे होते. बच्चन यांच्या पाया पडण्यासाठी वाकले असताना त्यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला”, असा सयालीच्या नावे दावा करणारा खोटा मेसेज व्हायरल झाला होता.
नेमके काय आहे हे प्रकरण?

हे प्रकरण २०११ मधील आहे. एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी आपल्याला ‘बॅड टक’ केला होता, अशी पोस्ट सयालीच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हा ‘मी लैंगिक अत्याचारांना नाही, तर सायबर क्राईमला बळी पडले’, असे सयालीने नंतर स्पष्ट केले होते. अमिताभ यांच्यावर  गैरवर्तनाचा आरोप केले नाहीत, असे तिने म्हटले होते. अमिताभ यांच्याशिवाय शायनी अहुजा, साजिद खान आणि आर्य बब्बर या बॉलिवूड सेलिब्रेटींवर गैरवर्तनाचे आरोप करणारे सयाली भगत हिचे खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढेच नाही तर ‘खोटी प्रेस नोट’ काढून सयालीच्या नावे फिरवण्यात आली होती.

[amazon_link asins=’B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5410f3f-cd1f-11e8-8e0d-9bc745fbc750′]

‘द ट्रेन’, ‘जेल’ या चित्रपटांतून झळकलेल्या माजी मिस इंडिया सायली हिने २०११ मध्ये एक पत्रक प्रसिद्ध केल्याचं म्हटलं गेलं होतं. या पत्रकात तिच्या म्हणण्यानुसार, ‘द वीकेंड’ या चित्रपटाच्या लॉन्चदरम्यान अमिताभ प्रमुख पाहुणे होते. ज्यावेळी ती आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेली तेव्हा बच्चन यांनी चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, या सर्व प्रकरणाला सायबर क्राईमचा संदर्भ देत सयालीने सर्व दिग्गजांची माफी मागत आपल्य़ा जुन्या प्रकाशकाने कोणत्याही परवानगीशिवाय हे पत्रक प्रसिद्ध केल्याचं तिने म्हटलं होतं.
या प्रकरणी तिने दिलगिरी व्यक्त केली होती. या सर्व गंभीर प्रकरणानंतर तिने खोटं प्रत्रक प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीविषयी तक्रारही दाखल केली होती.