धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; समर्थकांची पुण्यात रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:49 PM2019-02-09T14:49:14+5:302019-02-09T15:22:08+5:30

पुण्यातील आयटी अभियंता माेहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आराेपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली.

rally in support of dhananjay desai | धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; समर्थकांची पुण्यात रॅली

धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; समर्थकांची पुण्यात रॅली

googlenewsNext

पुणे : पुण्यातील आयटी अभियंता माेहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आराेपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने  सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी शेकडाे हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडाे कार्यकर्ते त्याला घ्यायला येरवडा कारागृहाजवळ जमा झाले हाेते. त्यानंतर शहरात भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली. 

जून 2014 मध्ये शिवाजी महाराज आणि बाळसाहेब ठाकरे यांच्याबद्दल साेशल मिडीयावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह फाेटाेमुळे पुण्यात दंगल उसळली हाेती. यावेळी दुपारच्या सुमारास मशिदीमधून नमाजानंतर घरी परतत असताना हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी माेहसीन शेखला मारहान केली हाेती. यात त्याचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी धनंजय देसाई आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या 21 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली हाेती. या 21 कार्यकर्त्यांपैकी 18 जण सध्या जामीनावर बाहेर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय देसाई याला सशर्त जामीन मंजूर केला. त्याला आज येरवडा मध्यवर्ती कार्यालयातून जमीनावर साेडण्यात आले. यावेळी धनंजय देसाईचे शेकडाे समर्थक कारागृहासमाेर जमा झाले हाेते. 

त्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात रॅली काढली.

Web Title: rally in support of dhananjay desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.