भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर पेट्रोलच्या दराबाबत प्रश्न विचारणे पडले महागात

चेन्नई :वृत्तसंस्ठा

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल 10 पैशांनी तर डिझेल 9 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे पेट्रोल 89.54 रुपये लीटर तर डिझेल 78.42 रुपयांवर पोहचले आहे. असे असताना भाजप कार्यकर्त्यांनी चक्क पेट्रोलचे दर विचारणाऱ्या एका रिक्षाचालकाला मारहाण केली.

तामिळनाडूमध्ये एका रिक्षाचालकाने पेट्रोलच्या दरावर प्रश्न उपस्थित करताच त्याला भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित मारहाण केली. हिंदू मुन्नानी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गणपती चतुर्थीच्या कार्यक्रमाला तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन या उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी एका रिक्षाचालकांने ‘ताई, पेट्रोलचे दर खूप वाढत आहेत’, असे म्हटले. भाजपाध्यक्ष यांच्यासमोर पेट्रोल दरवाढीचा प्रश्न उपस्थित केल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला धक्काबुक्की करीत मारहाण केली तसेच त्याला या कार्यक्रमातून हाकलून लावले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

[amazon_link asins=’B07G5BTYC2,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d2585f1-bb2f-11e8-b67c-4d31aa9451a6′]

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तमिलसाई सुंदरराजन यांच्यासमोर लेखिका लूई सोफिया यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली होती. भाजपने लूई विरोधात तक्रार दाखल केली होती. लूई यांना कोर्टाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती व त्यांची कोकिराकुलम जेलमध्ये रवानगी केली होती. या अटकेनंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

पाकिस्ताने कर्ज फेडण्यासाठी केला म्‍हशींचा लिलाव