भरदिवसा धारधार हत्याराने महिलेची निर्घृण खून

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन

अज्ञात मारेकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रेल्वे वसाहतीमध्ये धारदार शस्त्राने भरदिवसा महिलेची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. भारती धीरज जांभूळकर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B01LY2TN7G,B008QS9KMW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85cd098e-b971-11e8-9c0e-71b24f6c38e9′]

भारती धीरज जांभूळकर या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करीत होत्या. तर त्यांचे पती धीरज जांभूळकर हे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. धीरज हे सकाळी कर्तव्यावर गेले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास जेवणाकरीता घरी आले असता, धीरज यांना पत्नी भारतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. पत्नीचा मृतदेह पाहून घाबरलेल्या धीरज यांनी आरडाओरड केल्याने शेजारी गोळा झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, चार जिल्ह्यांत नव्वदीपार

घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. घरात मोठ्या प्रमाणात झटापट झाल्याचे पोलिसांना प्राथमिक दृष्ट्या आढळून आले. यावेळी पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. लवकरच मारेकऱ्याला अटक केली जाईल, अशी माहिती पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी दिली. हत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारेकऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत.