एक हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

छेडखानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98dae10f-ab98-11e8-a325-b330280bcd18′]

सुधीर पंजाबराव घुरडे (वय -४४) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास पाच हजारांची लाच घेताना अटक 

सुधीर घरडे हा अमरावती बस डेपोमधील पोलीस चौकीमध्ये कार्य़रत आहे. तक्रारदार एसटी बसमध्ये महिलेची छेडछाड करण्याच्या उद्देशाने चढला असल्याचे सांगून तक्रारदाराला पोलीस ठाण्यात घेऊ आला. पोलीस ठाण्यात तक्रारदाराला तुझ्यावर छेडखानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच केस गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी मध्ये एक हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सापळा रचला. सुधीर घुरडे याला एक हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. घुरडे यांचेवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7d8c57f-ab98-11e8-bd51-51e1f7c3b513′]

ही कारवाई लाचलुचपत प्रतीबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक चेतना तिडके, पोलिस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, पोलिस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस कॉस्टेबल प्रमोद धानोरकर,पोलीस हवालदार श्रीकृष्ण तालन, पोलीस शीपाई बोरसे, चालक अकबर यांच्या पथकाने केली.

पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या गाडीला अपघात 

वाचा आजच्या टॉप बातम्या