स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याने अल्पवयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन 

औसा तालुक्यात एका स्कूल बस चालकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी मानसिक तणावाखाली होती. हा मानसिक ताण सहन न झाल्याने पीडित मुलीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचालकासह एकाला ताब्यात घेतले आहे. शंकर महालिंग स्वामी (३०) व सुरज हिरासिंग ठाकूर (२०) अशी त्यांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44c3bf97-c78f-11e8-af34-c77f85ea2194′]

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही समदर्गा गावाचे रहिवाशी आहेत. औसा शहरातील एका विद्यालयात शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थी स्कुल बसने येत असतात. त्यासाठी शाळेने खंडू काळे व शंकर स्वामी या दोघांना बसचालक म्हणून नेमले आहे.

एसटी प्रवास आणखी महागणार, १८ टक्के भाडेवाढीचा पुन्हा प्रस्ताव

२८  सप्टेंबर रोजी खंडू काळेने सुरज ठाकूरला मुलींना सोडण्यास सांगितले. तेव्हा सुरजने समदर्गामध्ये गॅस संपल्याचे नाटक करुन शंकरला बोलावून घेतले. व पीडित मुलीवर खानापूर परिसरात नेऊन बलात्कार केला. या धक्कादायक घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती.

[amazon_link asins=’B00IN3WZYA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5bd0c78f-c78f-11e8-8b07-75f70ea3e7a8′]

अखेर हा धक्का सहन न झाल्याने तिने २९ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करुन आत्मह्त्या करण्याचा प्रयत्न केला. तिने विषारी औषध घेतल्याचे समजताच कुटुंबियांनी तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रूग्णालयात उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.