मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, मुलीचं नाव ठेवलं 'ऑगस्ट'

By namdeo kumbhar | Published: August 29, 2017 01:08 AM2017-08-29T01:08:44+5:302017-08-29T11:28:36+5:30

संपूर्ण जगाला कवेत घेऊ पाहणाऱ्या फेसबुक या महासोशल नेटवर्किंग साइट्‌सचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

KanyaRark to Mark Zuckerberg, named after the girl August | मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, मुलीचं नाव ठेवलं 'ऑगस्ट'

मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, मुलीचं नाव ठेवलं 'ऑगस्ट'

Next

सॅन फ्रान्सिस्को, दि. 29 - संपूर्ण जगाला कवेत घेऊ पाहणाऱ्या फेसबुक या महासोशल नेटवर्किंग साइट्‌सचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या दाम्‍पत्‍याने आपल्‍या मुलीचे नाव ऑगस्ट असे ठेवलं आहे.  फेसबुक पोस्टद्वारे झुकेरबर्गने आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली आहे. त्यासोबत दोघांनी ऑगस्टसाठी तिनशे शब्दांचा समावेश असलेले पत्रही लिहिले आहे. 

फेसबुकवर झुकेरबर्गने पत्नी आणि दोन मुलीसह फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर आपल्या मुलीसाठी त्याने एक पोस्टही लिहली आहे. 'प्रिय ऑगस्ट, तुझी आई आणि मला इतका आनंद झाला आहे की, तो व्‍यक्‍त करण्‍यासाठी आमच्‍याकडे शब्‍द नाहीत.  ज्यावेळी तूझ्या मोठ्या बहिनीचा जन्म झाला होता तेव्हा आम्ही जगासाठी पत्र लिहले होतं. ऑगस्ट, तू एका अशा जगात जन्माला आली आहे. जिथे तूला उत्कृष्ट शिक्षण मिळेल. समानता असेल. रोगराईला कोणताही थारा नसेल. कौशल्य विकास आणि समानतेला प्रोत्साहन यावरच तुमच्या पिढीचा भर असावा, सर्वांना शिक्षण मिळावे, रोगांचे उच्चाटन व्हावे, लोक आपापसांत जोडले जावेत आणि सशक्त समाज उभा राहावा, असे आम्हाला वाटते

ऑगस्ट, तू ज्या पिढीमध्ये जन्माला आली आहे. इथे विज्ञान आणि तंत्रज्ञानात सतत प्रगती होत राहिल. यामध्ये तू चांगले आयुष्य जगू शकशील. तूला आमच्यापेक्षा चांगले आयुष्य जगता येईल हे आमची जिम्मेदारी आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या असंख्य चिमुरड्यांसाठी हे जग सुखकर आणि आनंददायी बनवण्याची आमची जबाबदारीआहे. तू आम्हाला जो आनंद, प्रेम दिलंस तेच तुला भरभरुन लाभो अशा शुभेच्छा.’ असे सांगत मार्कने फेसबुकवर आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच या सर्व काळात आपल्याला भरभरून शुभेच्छा व पाठिंबा देणा-यांचेही मार्कने मनापासून आभार मानले आहेत.

पत्राच्या शेवटी झुकेरबर्गने म्हणतो, ऑगस्ट. आयुष्य सुंदर जगायला लावणारी पहिली पायरी म्हणजे बालपण. बालपण खरच छान असतं. सारं जग कसं मोकळं रान असतं. त्या चिमुकल्या पंखांना ... आभाळ देखील या वयामध्ये लहान वाटतं.  तू भविष्यबद्दल चिंता करु नकोस. बालपण हे फक्त एकदाच मिळते. ते मनसोक्त जग. तूझ्या भविष्याची चिंता करण्यासाठी आम्ही आहोत. वी लव यू सो मच. 

दरम्यान,  2015 मध्ये झुकेरबर्ग दाम्‍पत्‍याला पहिले कन्यारत्न झाले होतं. वॉरन बफे आणि बिल गेट्‌स यांचा कित्ता गिरवत मार्क आणि प्रिसिला चॅन या दांपत्याने फेसबुकचे 99 टक्के समभाग (शेअर) लोककल्याणकारी कामांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची बाजारपेठेतील किंमत 45 अब्ज डॉलर एवढी होती. ड्युरिंग अव्हर लाइव्हज या संस्थेला ही रक्कम दान केली गेली. 

Web Title: KanyaRark to Mark Zuckerberg, named after the girl August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.