खासदारांनी कापला वाढदिवशी संसदेच्या प्रतिकृतीचा केक सोशल मिडियावर झाले ट्राेल 

आग्रा : वृत्तसंस्था

अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि आग्य्राचे भाजपा खासदार डॉ. रामशंकर कठेरिया यांनी त्यांच्या जन्मदिनी संसदेची प्रतिकृती असलेला केक कापला आहे. त्यांच्या या कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियाने कठेरियांवर टीकेची झोड उठवली आहे. संसदेची प्रतिकृती असलेला केप कापत असतानाचा कठेरिया यांचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19bda170-bf10-11e8-b4f2-e9342550865d’]

रामशंकर कठेरिया यांचा शुक्रवारी ५४ वा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांनी तब्बल ५४ किलोंचा केक कापला. या केकवर संसदेची प्रतिकृती होती. केकवरील संसदेवर तिरंगादेखील लावण्यात आला होता. मात्र केक कापण्याआधी तो काढण्यात आला. संसद भवन, त्यासमोरील रस्ता, त्यावरुन जाणाऱ्या गाड्या, आसपासची हिरवळ केकवर दाखवण्यात आली होती. कठेरिया यांनी केक कापल्यानंतर त्यांच्या एका समर्थकाने केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा फोटो व्हायरल झाला.
[amazon_link asins=’B00TFGWAA8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ce3dc91-bf10-11e8-907d-3b1ec609756e’]

संसदेची प्रतिकृती असलेला केक कापल्याने सोशल मीडियाने कठेरियांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांनीदेखील कठेरिया यांच्या या कृतीचा चांगलाच समाचार घेतला आहे. कठेरिया यांना राष्ट्रचिन्हाविषयीच आदर नाही. त्यामुळे त्यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनेही कठेरियांचा निषेध केला आहे. भाजपाने कठेरियांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

पुण्यातील मानाचे पाचही गणपती मार्गस्थ