तब्बल १३८ वर्षांनंतर पुण्यातील ‘त्या’ शाळेत मुलींना प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या पुण्यनगरीत अख्या भारतभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. पुण्यात अशा अनेक शैक्षणीक संस्था आहेत ज्या लोकमान्य टिळकांच्या काळापासून पुण्यात आस्तित्वात आहेत . त्यापैकीच एक म्हणजे ‘द न्यू इंग्लिश स्कूल’ . यंदा या शाळेमध्ये तब्ब्ल १३८ वर्षांनंतर मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.लोकमान्य टिळकांद्वारा या शाळेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून या शाळेत फक्त मुलांकरिता प्रवेश देण्यात येत होता पण या वर्षांपासून या शाळेत मुलींना देखील प्रवेश देण्यात आला आहे. १३८ वर्षांची परंपरा खंडीत करीत शालेय व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. लिंगभेद नष्ट करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शालेय व्यवस्थापनाने कळवले आहे.

लोकमान्य टिळक यांच्याबरोबरच विष्णु शास्त्री चिपळूणकर यासारख्या समाजसुधारकांचा देखील या शाळेच्या स्थापनेत हाथ होता. या शाळेची स्थापना १८८० मध्ये करण्यात आली होती. ही शाळा डेकन एजुकेशन सोसायटी द्वाराचालवली जाते.१९३६ मध्ये या सोसायटी अंतर्गत या शाळेत मुलगा आणि मुलगी दोन्हीसाठी शिक्षणाची सोया करून देण्यात आली होती. त्यानंतर सोसायटीद्वारा फक्त मुलींकरिता अहिल्यादेवी स्कूल ची स्थापना करण्यात आली होती.

यासंदर्भात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक नागेश मोने म्हणाले की, “ते दिवस आता मागे गेले आहेत जिथे मुलगा -मुलगी वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेत होते. एकत्र शिक्षण घेत असताना स्त्री -पुरुष सामान आहेत याची जाणीव विद्यार्थयांमध्ये होते. यावर्षी आतापर्यंत या शाळेत २५ मुलीनी प्रवेश घेतला आहे.अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.