पंतप्रधान मोदी हत्येचा कट रचल्या प्रकरणी तपास फास्टट्रॅक पद्धतीने व्हावा

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

आम आदमी पार्टीतर्फे श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश, संदीप सोनावणे, सईद अली आदी कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना शनिवारी निवेदन दिले. पंतप्रधान मोदी हत्त्या कट प्रकरणी संशयितांची त्वरीत चौकशी करून कोर्टात पुरावे सादर करावेत तसेच हा खटला न्यायालयात डेली हिअरिंग/ फास्टट्रॅक पद्धतीने चालवून निकालात काढावा आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी कटाचा तपास त्वरीत करावा असे निवेदनात म्हटले आहे.

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे पंतप्रधान पदावर असताना झालेल्या हत्त्या हे सहिष्णुतेचे प्रतिक असलेल्या भारत या देशाला न शोभणारे आहे. एल्गार परिषद प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली. त्यातील एकाकडे मिळालेल्या पत्रात पंतप्रधान मोदी यांच्या हत्येच्या कटाबाबतचा उल्लेख आहे अशी माहिती कोर्टात वकिलांनी दिली आणि मुख्यमंत्र्यांनीही सांगितले. सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात चौथ्या वेळेस भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा जीव धोक्यात आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी एकास अटक