सेलिब्रिटीही गणरायाच्या स्वागतात दंग

मुंबई : पोलीसनामा

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. पहाटे ५ वाजता सिद्धिविनायकाची काकडआरती करण्यात आली. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रीघ लागली.

पुण्यासह राज्यभरात विघ्नहर्त्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन 

तिकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी सामान्य भाविकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांची गर्दी असते. यंदा लालबागच्या राजाने मोरांच्या पिसांची प्रभावळ धारण केली आहे. स्टेजवर पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावाही उभारण्यात आला आहे. विद्युत रोषणाई आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांनी सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या दरबारात गर्दी केली आहे.

[amazon_link asins=’B07FH4PDHJ,B01FM7GG58,B0756RCTK1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc302e8b-b724-11e8-b2f5-2fdadd9e3a37′]
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरीदेखील गणरायाचे आगमन झाले. अंबांनीचे पुत्र अनंत अंबानी यांनी स्वत: चित्रशाळेत पूजा केली आणि सजवलेल्या ट्रकमधून बाप्पाला घरी आणले.  लालबागच्या राजासारखीच दिसणारी ५ फुटांची ही मूर्ती आहे. गेल्या ४ वर्षांपासून सागर पांचाल ही मूर्ती खास अंबानी कुटुंबीयांसाठी साकारतात. चिंचपोकळीच्या अतुल सागर आर्ट चित्रशाळेत ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

सलमान खान हा गेल्या काही वर्षापासून घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात़ वाजत गाजत गणरायाचे गणरायाचे त्याच्या घरी स्वागत केले जाते.

भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला १२७ वर्ष पूर्ण

नाना पाटेकर हे आपल्या मुंबईतील घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात़ त्यासाठी फुलांची सजावट ते करीत असतात़ हिंदीतील अनेक कलावंत ही आपल्या घरी गणपती उत्सव साजरा करतात. चॅनेलवरील विविध मालिका, त्यांचे प्रामोशन, जाहीर कार्यक्रम यामुळे आता मराठी कलावंतही वर्षभर बिझी असतात. पण, गणेशोत्सवासाठी ते आपल्या या संपूर्ण बिझी शेड्युलला राम राम करतात. अनेक कलावंत मुंबईहून खास गणेशोत्सवासाठी आपल्या घरी गावाकडे जातात.

फुले महागली : झेंडू १६०, अस्टर ४००, मोगरा ८०० ते १ हजार रुपये प्रति किलो 

अभिनेत्री विद्या करंजीकर हिच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. दोन दिवस अगोदर नाशिकला येऊन ती सर्व खरेदी करत असते. अभिनेत्री पल्लवी कदम ही दर वर्षी नैसर्गिक वस्तुंचा वापर करुन निसर्गाचा देखावा साकारते़ किरण भालेराव याच्याकडे दहा दिवस दोन बाप्पा असतात. गेल्या वर्षी विराजमान असलेल्या  बाप्पा ची वर्षभर पूजा केल्यानंतर या वर्षी विसर्जित करतात. अनेक कलावंत गणपती उत्सावासाठी खास सुट्टी घेत असतात.