Please enable javascript.शंकराचार्यांची निर्दोष सुटका - Sankararaman-murder-case-Court-acquits-all-accused - Maharashtra Times

शंकराचार्यांची निर्दोष सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2013, 12:30 pm
Subscribe

कांची कामकोटि पीठाचे व्यवस्थापक शंकररमन यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह अन्य सर्व आरोपींची पद्दुचरी कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. २००४ मध्ये झालेल्या या हत्येप्रकरणात जयेंद्र सरस्वती आणि त्यांचा भाऊ विजयेंद्र यांच्यासह २३ जणांवर आरोप ठेवण्यात आला होता.

sankararaman murder case court acquits all accused
शंकराचार्यांची निर्दोष सुटका
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई

कांची कामकोटि पीठाचे व्यवस्थापक शंकररमन यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह अन्य सर्व आरोपींची पद्दुचरी कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. २००४ मध्ये झालेल्या या हत्येप्रकरणात जयेंद्र सरस्वती आणि त्यांचा भाऊ विजयेंद्र यांच्यासह २३ जणांवर आरोप ठेवण्यात आला होता.
व्हिडिओ
शंकररमन यांच्या हत्येप्रकरणी निर्णय देण्याची प्रक्रिया तब्बल नऊ वर्ष सुरू होती. पद्दुचेरीच्या सेशन कोर्टच्या न्या. सी.एस. मुरुगन यांनी बुधवारी निर्णय सुनावला. २००५मध्ये जयेंद्र सरस्वती यांनी हा खटला तामिळनाडू येथून पद्दुचेरी येथे हलवण्यात याण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यानंतर हा खटला पद्दुचेरी येथे चालवण्यात आला.

तमिलनाडूतील कांचीपुरम येथील वरदराजपेरुमल मंदिराचे मॅनेजर शंकररमन यांची 3 सप्टेंबर २००४ रोजी हत्या करण्यात आलेली होती. पोलिसांचा संशय कांची मठाच्या लोकांवर होता. चौकशीनंतर शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध कलम लावण्यात आले होते. २००९ पासून २०१२पर्यंत चालेल्या खटल्यातील सुनावणीत १८९ लोकांची साक्ष नोंदवण्यात आलेली होती. मात्र त्यातील ८३ साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली होती. अखेर सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष ठरवले आहे.
कॉमेंट लिहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज