Please enable javascript.बंड कॅमे-यात बंद - बंड कॅमे-यात बंद - Maharashtra Times

बंड कॅमे-यात बंद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 9 Aug 2011, 3:00 am
Subscribe

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील संभाव्य आरक्षणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय या संकटातही शिवसेना अभंग राखण्याकरिता शिवसेनेच्या मदतीला आला आहे चक्क कॅमेरा. आरक्षणामुळे बंडाची निशाण फडकवण्याची शक्यता असलेल्या काही नगरसेवकांकडून कॅमेरासमक्ष पक्षनिष्ठेच्या आणाभाका घेतल्या जात आहेत.

बंड कॅमे-यात बंद
- व्हिडिओग्राफीत झाल्या आणाभाका- वॉर्ड गेला तरी शिवसेनेतच राहू!- पक्षफुटीवर केला नामी उपाय.....................म. टा. खास प्रतिनिधीस्टिंग ऑपरेशनने गुपित उघड करणाऱ्या कॅमेरावर शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचा खुन्नस असला तरी, हाच कॅमेरा मुंबई महापालिका निवडणुकीतील संभाव्य आरक्षणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय या संकटातही शिवसेना अभंग राखण्याकरिता शिवसेनेच्या मदतीला आला आहे. आरक्षणामुळे बंडाचे निशाण फडकवण्याची शक्यता असलेल्या काही नगरसेवकांना कॅमेरासमोर बसवून कोणत्याही परिस्थितीत बंड करणार नाही आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या आणाभाका घेण्यास भाग पाडले जात आहे.महापालिका निवडणुकीत महिलांसाठी वा इतर जातीजमातींसाठी वॉर्ड राखीव झाल्यावर एखाद्या नगरसेवकाने आपल्या बायकोला वा इतर नातेवाईकांनाच तिकीट द्या, असा आग्रह करीत बंडखोरीचे निशाण फडकाविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला योग्य तो धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने पूर्णपणे तयारी केली आहे. वॉर्ड राखीव झाला तरी मी बंडखोरी न करता पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन अशाप्रकारच्या विद्यमान नगरसेवकांच्या मुलाखतीच कॅमेराबद्ध करण्यात आल्या असून नगरसेवकाने पलटी मारल्यास या मुलाखतीच पुराव्यादाखल त्याच्याविरोधात वापरण्यात येतील.आरक्षणामुळे निम्म्याहून अधिक विद्यमान पुरुष नगरसेवकांना तिकिटापासून वंचित रहावे लागणार असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडे महिलांची आधीपासूनच मजबूत फळी असल्याने या महिलांची शिबिरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्या महिलांना पदाधिकारी निवडून येऊ शकतात, त्यांना आधीपासून नोकरीचा तसेच त्या भूषवित असलेल्या पदांचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरी करणाऱ्यांची संख्याही मोठी असेल. त्यामुळे त्यांना थोपवून धरण्यासाठी शक्कल लढवली जात आहे. शिवसेनेच्या विभाग क्रमांक सहाचे विभागप्रमुख अजय चौधरी यांनी यावर रामबाण उपाय शोधत विभागातील सर्व नगरसेवकांचे अलिकडेच एक शिबीर आयोजित केले होते. यावेळी शिवसेनेचे, भारतीय विद्याथीर् सेनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच नेते उपस्थित होते.तुमचा वॉर्ड महिला राखीव झाल्यास तुम्ही काय करणार या विषयावर यावेळी नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वांसमक्ष मुलाखती असल्याने प्रत्येकाला त्यागाचीच भाषा करावी लागली. यावेळी बहुतेक सर्वच नगरसेवकांनी, माझा वॉर्ड महिलांच्या ताब्यात गेल्यास मी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन, माझ्या नातेवाईकांनाच तिकिट द्या असा आग्रह धरणार नाही, असाच सूर आळवला. मी बंडखोरी केली तर मला ठार मारा इथेपासून ते माझा वॉर्ड राखीव होईल हे गृहित धरून महिला उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी सर्व तयारी केली आहे अशी मते अनेकांनी व्यक्त केली. या मुलाखतींचे व्हिडिओ शुटींग करण्यात आले असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोेणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर ही कॅसेट त्याला दाखवून शांत करायचे आणि त्यानंतरही त्याने पुढचा मार्ग अवलंबल्यास त्याच्याविरोधातील प्रचारात ही कॅसेट वापरून धडा शिकविण्यात येणार आहे.
कॉमेंट लिहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज